मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला. रेशीम बागेमध्ये, संघाच्या कार्यकारिणीमध्ये या देशातील सर्व जातींना आरक्षण दिले पाहीजे, असा ठराव करा आणि मग आमच्यावर बोला, असे आव्हान यावेळी धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी दिले.
विरोधक आज उठतात आणि आमच्यावर बिनबुडाचे आरोप करतात. मध्य प्रदेशच्या निकालाचे दाखले विरोधक देतात. मग सत्ता असताना भाजपने मागच्या पाच वर्षात मध्य प्रदेशसारखा निर्णय का घेतला नाही? असा सवालदेखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
विरोधक आज उठतात आणि आमच्यावर बिनबुडाचे आरोप करतात. मध्य प्रदेशच्या निकालाचे दाखले विरोधक देतात. मग सत्ता असताना भाजपने मागच्या पाच वर्षात मध्य प्रदेशसारखा निर्णय का घेतला नाही? असा सवाल देखील ना. मुंडे यांनी उपस्थित केला.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 25, 2022
भाजप सरकारच्या काळातच ओबीसी आरक्षणाच्या विरोधात केस दाखल झाली, फडणवीस मुख्यमंत्री असतानाच सुप्रीम कोर्टात साक्षीपुरावे सादर झाले आणि फक्त निकाल आमच्या काळात लागला. मग आमच्यावर कसे काय आरोप करतात? भाजपने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. मंडल आयोगाच्या शिफारशी सर्वात आधी महाराष्ट्रात लागू झाल्या होत्या आणि त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते आदरणीय शरद पवार साहेब. पवार साहेबांनी ओबीसींना जेवढा न्याय दिला, तेवढा या देशात कुणीही दिलेला नाही. असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा पहिले प्रदेशाध्यक्षपद पवार साहेबांनी छगन भुजबळ यांच्याकडे दिले. जेव्हा राज्यात पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा सत्तेतील सर्वात महत्त्वाचे पद हे छगन भुजबळ यांना दिले. विरोधक आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि ओबीसी समाज बॅकफुटवर जातोय. आपण बॅकफुटवर न जाता विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले पाहीजे. राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा जेव्हा सत्तेत होती, तेव्हा ओबीसींना किती पदे दिली याची माहिती लोकांना द्या. जे लोक आरोप करत आहेत त्यांनी स्वतः ओबीसींना किती पदे दिली, किती न्याय दिला? याचाही जाब विचारा. भारतीय जनता पार्टीने एका एका जातीची जेवढी फसवणूक केली आहे, तेवढी फसवणूक इतर कोणत्याही पक्षाने केलेली नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाच्या चौकटीत टिकेल. त्यात सिंहाचा वाटा हा छगन भुजबळ साहेबांचा असेल. आरक्षणाशिवाय राज्यातील निवडणुका होणार नाहीत, अशी आमची ठाम भूमिका आहे. कोर्टातील लढाई अंतिम टप्प्यात आली असून त्यात आपला विजयच होईल, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Women’s T20 Challenge 2022 SNO vs VEL : अनोखी स्टाईल ! महाराष्ट्राच्या २३ वर्षीय गोलंदाजाची ॲक्शन पाहून तुम्हीही व्हाल थक्क; पाहा!
- छकुलीचा ‘पोटरा’ कान्समध्ये गाजतोय; इकडे तिच्या झोपडीला मात्र गळती…
- “ओबीसींच्या आरक्षणाविषयी छगन भुजबळ एकटेच बोलत आहेत, पण…”, जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
- IPL 2022 GT vs RR : अनलकी संजू सॅमसन..! मॅचही गमावली आणि ‘नकोसा’ विक्रमही केला नावावर; वाचा झालं काय!
- Women’s T20 Challenge 2022 SNO vs VEL : हरमनप्रीत कौरचा ‘ सुपरवुमन’ अंदाज! घेतला जबरदस्त कॅच; पाहा VIDEO!

