Share

IPL 2022 DC vs MI : “मला वाटले की…” ऋषभ पंतने सांगितले दिल्लीच्या पराभवाचे मोठे कारण, काय म्हणाला?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022)मधील ६९ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा ५ गडी राखून विजय पराभव केला. सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीने १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईने ५ गडी राखून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. सामन्यात दिल्लीने बऱ्याच चुका केल्या. या चुकांचं खापर आता दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतवर फोडले जात आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा पराभव

मुंबईकडून ५ गडी राखून पराभूत झाल्यानंतर आयपीएलमधून बाहेर पडलेल्या दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘त्याच्या संघाला चांगली रणनीती आणि चांगल्या अंमलबजावणीची गरज होती. आम्ही सामन्यात बहुतांश वेळा चांगल्या स्थितीत होतो. पण त्या स्थितीत पोहोचल्यानंतर आम्ही आमची पकड कायम ठेवू शकलो नाहीत. संपूर्ण स्पर्धेतील बऱ्याच सामन्यातही असेच घडले आहे. हा दबावाचा विषय नव्हता, तर एक चांगली रणनीती बनवण्याची आणि ती अधिक चांगल्या प्रकारे राबवण्याची गरज होती’. तो पुढे म्हणाला, ‘संपूर्ण स्पर्धेत रणनीतीच्या अंमलबजावणीची कमतरता होती. आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत आणि पुढच्यावर्षी एक मजबूत संघ म्हणून परत येऊ’.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1528198933440348161?s=20&t=OWfOjVDZn_SMQHMeKStyRA

DRS घेण्यात चूक झाली

टिम डेव्हिड मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. डेव्हिडने ११ चेंडूत ३४ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सुरुवातीला टिम डेव्हिड वैयक्तिक एकेरी धावसंख्येवर आसताना क्लीन आऊट झाला होता. पण पंचानी त्याला आऊट दिले नाही आणि दिल्लीच्या संघानेही रिव्ह्यूही घेतला नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या या चुकांवर ऋषभ पंत म्हणाला, ‘मला वाटले की चेंडू बॅटला लागला होता पण सर्कलमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूंना याची खात्री नव्हती. मी काय करु ते विचारले आणि शेवटी रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!