🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि नेते संतोष धुरी हे मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. देशपांडे आणि धुरी या दोघांनी पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. दरम्यान या दोघांवरही त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता, पोलीस महिला कर्मचारीला धक्का देऊन व त्यांना जमिनीवर पाडून पळ काढला असा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला होता. तेव्हापासून मनसेचे हे दोन्ही नेते नॉट रिचेबल होते. यावर आता राज ठाकरे महाविकासआघाडी सरकारवर चांगलेच बरसले आहेत.
“आमच्या संदीप देशपांडेच्या मागे पोलीस असे काही मागे लागले होते की, संदीप जणू पाकिस्तानचा बॉर्डर पार करून आला आहे. इतके त्याच्या मागे लागले होते. त्याचा शोध घेत होते. त्याच्या घरी जात होते. शेवटी त्याच्या बायकोने फ्रीजचं दार उघडून दाखवत म्हंटलं की, तो घरात नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे देशपांडे आणि धुरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करतानाच पोलिसांना फटकारलं आहे. ‘ही केस कोणत्याही तथ्यांवर आधारित नसून काल्पनिक आहे’ असे न्यायालायने म्हंटले आहे. आरोपींमुळे इतरांच्या जीवाला धोका होता, हा पोलिसांचा दावा न्यायालयाने आपल्या निकालपत्रात सपशेल फेटाळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
