🕒 1 min read
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात २२ मे रोजी (रविवारी) सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांची सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी मनसेला खोचक सवाल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिपाली सय्यद सतत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दिसून येत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी खोचक सवाल करत मनसेला डिवचले आहे.
“सभा रद्द करून कोणताच मुद्दा शेवट पर्यंत मार्गी न लावण्याची परंपरा राज साहेबांनी कायम ठेवली त्याबद्दल खंत आहे. पण पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का, हा यांच्या पक्षाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल कि नाही!”, असा सवाल दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत केला आहे.
सभा रद्द करून कोणताच मुद्दा शेवट पर्यंत मार्गी न लावण्याची परंपरा राज साहेबांनी कायम ठेवली त्याबद्दल खंत आहे. पण पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का हा यांच्या पक्षाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल कि नाही! @ShivSena @mnsadhikrut
— Deepali Sayed (@deepalisayed) May 21, 2022
दरम्यान राज ठाकरेंनी भोंगेविरोधी भूमिका घेतल्लीयानंतर वसंत मोरे (Vasant More) पक्षात नाराज आहेत. त्यांची नाराजी त्यांनी उघड बोलूनही दाखवली आहे. पक्षातील महत्त्वाच्या बैठकांना त्यांना आमंत्रण दिलं जात नाही, त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत छापलं जात नाही. असा आरोप स्वत: वसंत मोरे यांनी केला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे वेळ देऊन मुंबईकडे रवाना झाल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे. यावरच बोट ठेवत दिपाली सय्यद यांनी मनसेला टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध; न्यायालयाने नोंदवले निरीक्षण
- ‘शंतनू’ला मिळाला प्रतिष्ठेचा ‘देवर्षी नारद जयंती पुरस्कार’! वाचा शंतनूची गरूडभरारी…
- पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?; निलेश राणेंचा खोचक सवाल
- “…यामुळे राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत”, संजय राऊतांनी सांगितले कारण
- तरुणांना काँग्रेस पक्षात आपले भविष्य दिसत नसेल तर कसे व्हायचे?; संजय राऊतांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
