Share

IND vs SA 2022 : चाहत्यांसाठी खुशखबर! दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच करणार कर्णधाराची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम संपल्यानंतर जून महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुध्द घरेलु मालिका खेळणार आहे. त्यामूळे क्रिकेट चाहत्यांना लवकरच एक चांगली बातमी मिळणार आहे. बीसीसीआय (BCCI) क्रिकेट चाहत्यांना एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका जूनमध्ये पाच वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मालिकेतील सर्व सामन्यांसाठी स्टेडियममध्ये पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुध्द पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना ९ जून रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी, बीसीसीआय (BCCI)च्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत बीसीसीआय पूर्ण प्रेक्षकांसह स्टेडियम उघडणार आहेत.” महत्त्वाचं म्हणजे बीसीसीआयने आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या प्लेऑफसाठी सर्व तिकिटे विकण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आयपीएलच्या चालू हंगामात देखील स्टेडियममध्ये चाहत्यांची उपस्थिती दिसून आली परंतु उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली. तथापि, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्‍या आगामी घरच्या टी-२० सामन्यांच्या ठिकाणी क्रिकेटचे तेच जुने वातावरण चाहत्यांना पहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका पाच वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहे, नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामन्याला सुरूवात झाल्यानंतर पुढील सामने अनुक्रमे कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बेंगळुरू येथे खेळवले जातील. दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्यांचा १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या उलट भारतीय संघ अजून जाहीर झालेला नाही. पण अनेक माध्यमांनी दावा केला आहे की कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या खेळाडूंना आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी विश्रांती दिली जाऊ शकते.

बीसीसीआय आता नव्या कर्णधाराच्या शोधात असून शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांची नावे चर्चेत असल्याचेही कळते. अनेक वरिष्ठ खेळाडू या मालिकेसाठी उपलब्ध नसल्यामुळे आयपीएल २०२२ मधील कामगिरीच्या जोरावर अनेक तरुण खेळाडूंना ही परिस्थिती एक उत्तम संधी निर्माण करून देऊ शकते.

महात्वाच्या बातम्या :

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!