🕒 1 min read
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त चलह यांनी लिहिलेल्या ‘कोविड वॉरियर’ या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडलं. यावेळी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीशी आपण कशाप्रकारे लढा दिला, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याप्रसंगी त्यांनी राजकीय फटकेबाजी ही केली. “वर्षभरापूर्वी अॅम्ब्युलन्सचे भोंगे वाजत होते आता बाकीचे भोंगे वाजायला लागलेत,” अशा शब्दात त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “साधारण वर्षभरापूर्वी सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. त्यावेळी फक्त अँब्युलन्सचे भोंगे वाजायचे, आता मात्र बाकीचे भोंगे वाजत आहेत. तेव्हा अँब्युलन्स सहज उपलब्ध होत नव्हते, साधे औषधोपचार करताना वाट लागायची. मुख्यमंत्रीपदाचा मला अनुभव नव्हता, कोविडचा तर जगाला नव्हता. कोविडवर अद्याप औषध आलेलं नाही. आपण कोविड मॅनेज करु शकतो, पण त्यावर ट्रिटमेंट नाही.”
“फेब्रुवारी महिन्यात कोविडची वाढ व्हायला लागल्यानंतर कोविड फार भयंकर असल्याचं लक्षात आलं. त्यासाठी फील्ड हॉस्पिटल आणि विविध उपाय योजनांची आवश्यकता होती. त्यासाठी सरकार म्हणून आम्ही प्रयत्न सुरु केले. एखाद्या टीमला काम द्यायचं तर त्याचा कॅप्टन मजबूत असायला हवा, नाहीतर टीम खेळणार कशी. पण त्यासाठी माझ्या टीमवर माझा आत्मविश्वास हवा आणि ते काम मी केलं. जर मुख्यमंत्रीच गर्भगळीत होऊन बसला असता तर आख्खं राज्य बसलं असतं,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
