🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघातात मृत्यू (Andrew Symonds Death) झाला. सायमंड्सच्या अकाली निधनाने जगभरातील क्रिकेटप्रेमींवर शोककळा पसरली आहे. सायमंड्स यांच्या निधनावर क्रिकेट जगतातील खेळाडूंनीही शोक व्यक्त केला आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनेही सायमंड्सला श्रद्धांजली वाहिली परंतु त्याने आपल्या ट्वीटमध्ये चूक केली. त्यानंतर त्याने चाहत्यांची माफीही मागितली.
सायमंड्सने वयाच्या ४६व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी, १९८ वनडे आणि १४ टी-२० सामने खेळलेल्या सायमंड्ससाठी भावनिक श्रद्धांजली वाहिली. आपल्या ट्वीटमध्ये इमोजी टाकण्याचा प्रयत्न करताना लक्ष्मणने चूक केली.
”भारतात पहाटे वाईट बातमी मिळाली. माझ्या प्रिय मित्रा, देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. ही दु:खद बातमी”, असे सायमंड्सने म्हटले. त्याने ट्वीटमधील इमोजीमध्ये चूक केली. लक्ष्मणने ट्वीटसह शेअर केलेल्या २ इमोजींमध्ये, एक तुटलेले हृदय आणि आनंदाश्रू असलेला इमोजी होता. यावर चाहत्यांनी लक्ष्मणच्या पोस्टला उत्तर देताना तो दुरुस्त करण्यास सांगितले.
Shocking news to wake up to here in India. Rest in peace my dear friend. Such tragic news ???????? pic.twitter.com/pBWEqVO6IY
— VVS Laxman (@VVSLaxman281) May 15, 2022
Apologies for the erroneous emoji! Meant to have put out ????
— VVS Laxman (@VVSLaxman281) May 15, 2022
लक्ष्मणला याची माहिती मिळताच त्याने त्यांच्या ट्वीला उत्तर देत चाहत्यांची माफी मागितली. ‘चुकीचे इमोजी पोस्ट केल्याबद्दल क्षमस्व’, असे त्याने म्हटले. सायमंड्सने कसोटीत २ शतके, एकदिवसीय सामन्यात ६ शतकांसह एकूण ५०८८ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
