Share

IPL 2022 MI vs KKR : टॉस जिंकल्यानंतर रोहितनं दिली ‘वाईट’ बातमी; कोलकातानं प्लेइंग इलेव्हनमध्ये केले पाच बदल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR)यांच्यात स्पर्धेचा ५६वा सामना रंगत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा स्टार खेळा़डू सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे, तर कोलकाताने अजिंक्य रहाणे, पॅट कमिन्स, शेल्डन जॅक्सन, वरुण चक्रवर्ती आणि वेंकटेश अय्यर या पाच खेळाडूंना संधी दिली आहे.

मुंबईच्या संघाने त्यांच्या दहापैकी दोन सामने जिंकले असून हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, कोलकाताने ११ पैकी चार सामने जिंकले असून संघासाठी प्लेऑफचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. चालू मोसमातील उभय संघांमधील हा दुसरा सामना आहे. सुरुवातीचे आठ सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सने गेल्या दोन सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्ससारख्या मोठ्या संघांना पराभूत केले आहे.

कोलकाता नाइट रायडर्सने त्यांच्या कामगिरीने कमालीची निराशा केली आहे. सुरुवातीला चांगली कामगिरी केल्यानंतर, संघ आपल्या लयीत दिसत नाही आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्याच्या मार्गावर आहे. शेवटच्या सामन्यात संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. आरोन फिंच आणि बाबा इंद्रजीत प्रभावित करण्यात अपयशी ठरले. त्याचबरोबर कर्णधार श्रेयस अय्यरही संघर्ष करताना दिसला आहे. संघाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना अजून नियमित प्लेइंग इलेव्हन सापडलेली नाही.

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कायरन पोलार्ड, रमणदीप सिंग, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ.

कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरिन, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, टिम साऊदी, वरुण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!