🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लीगच्या ५१व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्धच्या (GT vs MI) रंगतदार विजय नोंदवला. या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने चांगली खेळी केली. रोहितने २८ चेंडूत ४३ धावा केल्या. या सामन्यात त्याने आपल्या कामगिरीने चाहत्यांचीच मनेही जिंकली आणि एका षटकाराने ५ लाख रुपयांचे बक्षीसही मिळवले.
रोहित शर्माचे प्राणीप्रेम हे सर्वांनाच ठाऊक आहे. रोहित अनेकदा प्राण्यांच्या बचाव आणि संरक्षणाच्या मोहिमांमध्ये सहभागी होतो. काल ६ मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, त्याने त्याच्या एका षटकाराने काझीरंगातील गेंड्यांना ५ लाख मिळवून दिले आहेत. रोहितने वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या लेन्थ बॉलवर शानदार षटकार ठोकला.
टाटा मोटर्स ही आयपीएलची अधिकृत प्रायोजक आहे. आयपीएल २०२२ सामन्यादरम्यान फलंदाजाने खेळलेला फटका सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या ‘पंच कारवर आदळल्यास काझीरंगा नॅशनल पार्कला ५ लाख रुपये देण्याची घोषणा टाटा मोटर्सने केली होती. त्यामुळे रोहितने आपल्या षटकारामुळे मुंबईसाठी केवळ धावा केल्या नाहीत, तर एक उदात्त कामगिरीही केली आहे.
रोहित शर्माचा षटकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
असा रंगला सामना…
या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत ६ बाद १७७ धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने ४५ धावा केल्या. टीम डेव्हिडने २१ चेंडूत ४४ धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने ४३ धावांची खेळी खेळली. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक दोन बळी घेतले. हार्दिक पंड्याचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात ५ गडी गमावून १७२ धावाच करू शकला. शेवटच्या षटकात त्यांना ९ धावांची गरज होती, पण मुंबईकडून डॅनियल सॅम्सने अप्रतिम गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. गुजरातकडून वृद्धिमान साहाने ५५, शुबमन गिलने ५२ आणि कर्णधार हार्दिक पंड्याने २४ धावा केल्या. मुंबईकडून मुरुगन अश्विनने दोन बळी घेतले
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
