🕒 1 min read
ओबीसी आरक्षण मिळाले नसल्याने राज्य सरकारने महानगरपालिका निडणुकांना स्थगिती दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला असून विरोधी पक्षाचे नेते राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत. यातच आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याच मुद्द्यांवर एक वेगळी भूमिका मांडली आहे.
तर राज्यात ओबीसी आरक्षणावरून चाललेल्या राजकरणावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक पर्याय सुचवला आहे. यावर आता इतर पक्ष काय भूमिका घेणार आणि सर्वपक्ष एकत्र येऊन काही निर्णय घेणार का हे पाहायलाच हवं.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
