Share

“राज ठाकरे यांच्यासोबत युती करणं भाजपला महागात…” – रामदास आठवले  

Published On: 

🕒 1 min read

सांगली:  रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मनसे-भाजप यांच्यातील वाढत्या जवळीकीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. “राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतची युती भाजपला महागात पडेल”, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार चालतात. पण भाजपने राज ठाकरे यांच्यासोबत युती केल्यास त्या भूमिकेला तडा जाईल, असेही सांगलीच्या आटपाडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना रामदास आठवले म्हणाले.

यावेळी पुन्हा एकदा भाजपला मनसेशी युती करण्याची काहीही गरज नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. “मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही. महाराष्ट्रात भाजप आणि आरपीआय सत्तेत येईल आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करणे हीच आमची भूमिका आहे,” असे म्हणत रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच “सगळ्या मुस्लिमांना त्रास देण्याची बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती. त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत. बाळासाहेबांची कॉपी करणे एवढं सोप काम नाही”, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना “राज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत. वास्तविक पाहता भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यावं. राज ठाकरे यांच्या भोंग्या संबंधातील भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही”, असेही म्हणत रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!