मुंबई: राज्यात सध्या बाबरी कोणी पाडली याच्या श्रेयवादावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने बाबरी पाडताना फक्त शिवसेना पुढे असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पडताना तेथे एकही शिवसैनिक उपस्थित नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी थेट शिवसेना नेत्यांची नावे असलेला पुरावा देत फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.
“बाबरी मशीद उद्धवस्थ केल्याने ज्यांच्यावर गुन्हे आणि खटले दाखल झाले होते, त्यातील शिवसेना नेत्यांची नावे बघा. मामू, आणखी काही बोलायला हवे का? उचलली जीभ आणि…. खोटे बोल पण रेटून बोल.”, असे ट्वीट मनीषा कायंदे यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी बाबरी मशीद पाडताना गुन्हा झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची नावे असलेली लिस्टही पोस्ट केली आहे.
बाबरी मशीद ध्वस्त केल्याने ज्यांच्यावर गुन्हे आणि खटले दाखल झाले होते, त्यातील शिवसेना नेत्यांची नावे बघा.
मामू, आणखी काही बोलायला हवे का? उचलली जीभ आणि…. खोटे बोल पण रेटून बोल.. #BJP #DevendraFadnavis #babarmasjid@ShivsenaComms @AUThackeray @BJP4Mumbai @Dev_Fadnavis pic.twitter.com/unPv81PoC3
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) May 5, 2022
दरम्यान फडणवीस यांच्या दाव्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 1857 च्या लढ्यातही फडणवीसांचे मोठे योगदान असल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले होते. आता फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात यावरून कलगीतुरा उडाल्याचे दिसून येते. त्यामुळे बाबरी श्रेयवादामुळे पुन्हा एकदा सेना-भाजप आमने-सामने आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…याबद्दल राज्यातील कर्मदरिद्री विरोधी पक्ष खूश झाला”, संजय राऊतांचा खोचक टोला
- “बावनकुळे यांना उमेदवारी नाकारून भाजपने OBC…”, संजय राऊतांचा टोला
- “नुसत्या तोंडपाटीलक्या नकोत, करून दाखवा!”, संजय राऊतांचे भाजपला आव्हान
- IPL 2022 DC vs SRH : वॉर्नर-पॉवेलनं मारलं मैदान..! सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाची हॅट्ट्रिक!
- IPL 2022 DC vs SRH : एकच मन किती वेळा जिंकशील..! उमरान मलिकनं टाकला सर्वात वेगवान चेंडू; SPEED पाहून वाटेल अभिमान!

