🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (CSK vs RCB) पराभव पत्करावा लागला. अटीतटीच्या सामन्यात चेन्नईचा १३ धावांनी पराभव झाला. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीमुळे चेन्नईच्या संघाची स्थिती कठीण झाली आहे. चेन्नईला मागे टाकत आरसीबीने प्रत्येक विभागात विजय मिळवला. कप्तान महेंद्रसिंह धोनीने चेन्नईच्या पराभवाची कारणे सांगितले.
धोनी म्हणाला, ”आम्ही त्यांना १७० धावांवर रोखून चांगली कामगिरी केली. मला वाटते की आम्ही उत्तरार्धात चांगली कामगिरी करू शकलो असतो आणि आम्ही चांगली सुरुवात केली. सर्व काही ठीक होते पण फलंदाजी चांगली नव्हती. जेव्हा तुम्ही ध्येयाचा पाठलाग करत असता तेव्हा तुम्हाला काय आवश्यक आहे हे कळते. परिस्थिती काय मागणी करते हे पाहावे लागेल. शेवटी शॉटची निवड अधिक चांगली करता आली असती.”
चेन्नईचा कर्णधार म्हणाला, ”आम्ही चांगली सुरुवात केली आणि विकेट हातात होत्या, खेळपट्टी चांगली होत होती पण आम्ही नियमित अंतराने विकेट गमावल्या. आम्ही काही शॉट्स परत पाहू शकतो. शेवटी एक फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून तुम्ही मध्यभागी आहात आणि तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, काय चूक झाली हे आम्हाला पाहण्याची गरज आहे, तुमच्याकडे किती गुण आहेत यावरून विचलित होणे सोपे आहे. गुणतालिकेतील आपली स्थिती महत्त्वाची नाही, तर चुका आणि प्रक्रिया महत्त्वाची आहे.”
RCB takes this one by 13 runs. #RCBvCSK #WhistlePodu #Yellove???????? pic.twitter.com/4VfSi3woTo
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 4, 2022
असा रंगला सामना…
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ जवळपास आयपीएल २०२२ (IPL 2022) बाहेर झाला आहे. लीगच्या ४९व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईला (RCB vs CSK) १३ धावांनी मात दिली. महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिकच्या महत्त्वपूर्ण धावांच्या जोरावर बंगळुरुने चेन्नईला १७४ धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईकडून महिश थिक्षणाने तीन बळी घेतले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे वगळता इतर फलंदाज फ्लॉप ठरले. २० षटकात चेन्नईचा संघ ८ बाद १५९ धावांपर्यंतच पोहोचू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
