पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटम ३ मे ला संपला आणि अपेक्षेप्रमाणे मनसेकडून हनुमान चालीसाचं आंदोलन ४ मे पासून राज्यभर सुरु झालं. मात्र यामध्ये मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर कुठे दिसून आले नाही. काल पासून नॉट रिचेबल असलेले मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर अखेर आज प्रसारमाध्यमांच्या समोर आले आहेत. यावेळी त्यांनी राज ठाकरे व त्यांचं आंदोलनाची पुढची दिशा याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आंदोलनाचा पुढचा टप्पा पार पडणार आहे. आज दुपारनंतर मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांची, शहर कार्यालयात बैठक होणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने काल पोलिस मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस कारवाईमुळे मला समोर येता आले नाही, असे स्पष्टीकरण साईनाथ बाबर यांनी दिले.
पुढील दोन दिवसात शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु करणार राबवणार असल्याचे बाबर यांनी सांगितले. भोंग्याच्या संदर्भात शहरातील मौलवी आणि मुस्लिम बांधवांशी चर्चा करणार असल्याचे, असेही त्यांनी सांगितले. यापुढेही आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
