Share

IPL 2022 RCB vs CSK : मॅचपूर्वी विराट कोहलीनं जिममध्ये गाळला घाम; बायकोसोबतचा VIDEO झाला व्हायरल!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs CSK) यांच्यात मोठा सामना होणार आहे. महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली हे दोन खेळाडू या सामन्याचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. धोनीने पुन्हा एकदा चेन्नईचे कप्तानपद स्वीकारले असून विराट आपल्या नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त झाला आहे. या मॅचपूर्वी विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीने आयपीएल २०२२ मध्ये पुन्हा वेग पकडला आहे. गुजरातविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते. आता विराट चेन्नई सुपर किंग्जशी सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याआधी, विराटने जिममध्ये भरपूर घाम गाळला. येथे पत्नी अनुष्का शर्माही व्यायाम करत होती. विराटची गणना क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. विराट फिटनेस राखण्यासाठी खूप मेहनत घेतो आणि पत्नी अनुष्का शर्माही यात त्याला साथ देते.

आयपीएलच्या या हंगामात बंगळुरू संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. संघाने आतापर्यंत १० पैकी पाच जिंकले असून त्यांचे १० गुण झाले आहेत. कर्णधारपद सोडल्यापासून विराटसाठी हा मोसम काही खास राहिला नाही. विराटला आतापर्यंत १० सामन्यांत केवळ १८६ धावा करता आल्या आहेत. यात गुजरात टायटन्सविरुद्धच्या मागील सामन्यात झळकावलेल्या अर्धशतकाचा समावेश आहे. आता तो आजल बुधवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही तो आपला फॉर्म कायम ठेवू इच्छितो.

अनुष्काही विराटसोबत बंगळुरू कॅम्पमध्ये असून गुजरातविरुद्धच्या सामन्यातही ती स्टेडियममध्ये दिसली होती. कोहलीने अर्धशतक झळकावल्यावर अनुष्काने टाळ्या वाजवून त्याचा आत्मविश्वास वाढवला. नुकताच अनुष्काने तिचा वाढदिवसही साजरा केला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!