Share

“…तर जीभ आम्हालाही आहे”; राज ठाकरेंच्या भाषणानंतर इम्तियाझ जलील यांचा इशारा

Published On: 

औरंगाबद : महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच त्या मशिदिंवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा दिला. ४ तारखेपर्यंत भोंगे ऐकून घेणार नाही, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.

“सियासत की दुकानों मे रोशनी के लिए, जरुरी है मुल्क मेरा जलता रहें”, हाच हेतू राज ठाकरेंच्या भाषणाचा होता, अशी टीका जलील यांनी केली. राज ठाकरेंनी ४ तारखेपर्यंत भोंगे ऐकून घेणार नाही, असा इशारा दिला, यावर जलील म्हणाले “ते म्हणतात इशारा, तर आता पोलिसांनी अर्थ सांगावा, नाही सांगितला तर आम्हालाही जीभ आहे, तुमच्यापेक्षा चांगल्या भाषेत आम्ही उत्तर देऊ शकत. पण यांचा दंगल करायचा हा डाव आहे.”

जलील म्हणाले, “राज ठाकरे यांचा इशारा हा मुस्लिम जनतेला नाही, राज्याला आहे. आम्हाला पाहायचं आहे आणि आता हे कसे निर्णय घेतात खास करून राष्ट्रवादीचे लोक काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे”

“राज ठाकरेंनी भोंगे काढण्यास एक दिवस वाढवला आहे. तरुणांना मशिदींसमोर जाऊन भोंगे लावा असे सांगून, तुम्ही अयोध्याला चालला आहात, समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून तरुणांची दिशाभूल करण्यात येत आहे.”, अशी टीका जलील यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!