Share

“कोरोनानंतर फुकट करमणूक होत असेल तर…” उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हिंदुत्वाच्या, मराठीच्या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. असे खेळाडू कोणत्या कोणत्या मैदानात कोणकोणते खेळ करतात हे आतापर्यंत जनतेने अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी याचा खेळ, कधी त्याचा खेळ, असे काही खेळाडू खेळ करतात. दोन वर्ष लॉकडॉऊन आणि कोरोनात गेले. यामध्ये नाटक, थिएटर, मनोरंजन पूर्ण बंद होतं, त्यामुळे फुकट करमणूक होत असेल तर का नाही पाहायची? असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

गुढीपाडवा मेळ्याव्यापासून राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक झाले आहेत. मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत मनसे अधिक आक्रमक होत आहे. राज ठाकरे यांचा पक्षाचा झेंडाही अलीकडे पूर्ण भगवा झाला आहे. राज ठाकरे याचं स्वागत विविध ठिकाणी भगव्या शालीने केले जात आहे. यामुळे आता मनसेची वाटचाल आक्रमक हिंदुत्वाकडे कललेली असून, प्रखर हिंदुत्त्वाचा मुद्दा मनसेने हाती घेतला आहे. यापार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

आधी मराठी म्हणून इतर भाषिकांना हाकलून द्यायचं आणि आता हिंदू म्हणून त्यांना घरात घ्यायचं, हे माकडचाळे आहेत. असे माकडचाळे करणारे खूप असतात. अशा गोष्टी ढोंग आहेत. भोंगा हा विषय संपूर्ण देशासाठी आहे. भोंगाबंदी केंद्राने देशभर करायला हवी.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!