Share

“ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून…”, ‘त्या’ प्रकरणावरून केशव उपाध्येंचा शरद पवारांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोरेगाव भीमा दंगलीच्या निमित्ताने शरद पवार यांनी भाजपला बदनाम करण्यासाठी खोटं बोलत तत्कालीन राज्य सरकारनं पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र होते असा आरोप केला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्यांनी पत्र लिहिलं होतं. पोलिसांनी मूळ पुरावे नष्ट करून अनेक खोटे पुरावे तयार केल्याचा दावाही केला. परंतु आता या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पवारांनी आपल्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही. कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही असं प्रतिज्ञापत्र सादर केलंय. यातून शरद पवारांचा खोटेपणा उघड झाला आहे. अशी टीका भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी ट्वीट करत केली आहे.

“इतक्या मोठ्या नेत्याने केवळ राजकारणासाठी खोटेपणाचा वापर करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं आणि पत्रकार परिषद घेत सातत्याने भाजपला बदनाम करावं हे दुर्दैवी म्हणावे लागेल. मात्र पवारांकडून दुसरी अपेक्षा करणार तरी कशी? ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून आहे.”, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगासमोर ११ एप्रिल रोजी दाखल केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी म्हटले होते की, “कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनाक्रमबद्दल माझ्याकडे व्यक्तिगत माहिती नाही. परंतु, या घटनेच्या अनुषंगाने भादंवि आणि फौजदारी दंड संहितेत काही  कायदादुरुस्ती होणे आवश्यक आहे, असे मला सुचवावेसे वाटते. असे शरद पवार (sharad pawar) यांनी म्हटले.

तसेच ब्रिटिश काळात स्वातंत्र्य चळवळ दडपण्याच्या उद्देशाने भारतीय दंड संहितेत समाविष्ट करण्यात आलेल्या १२४-अ या राजद्रोहाच्या आरोपाच्या कलमाचा गैरवापर होत आहे. त्यामुळे या कलमाचा गैरवापर हा कायदादुरुस्तीद्वारे थांबवायला हवा किंवा हे कलमच रद्द करायला हवे असेही पवार यांनी म्हटले.

दरम्यान हनुमान चालीसा प्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी राजद्रोहाचे कलम लावले आहे.  त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या या मताबाबत काल चर्चा झाली.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!