Share

राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर; राजकीय वातावरण तापणार? चर्चांना उधाण

Published On: 

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या मालिकाही बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता २९, ३० एप्रिल रोजी राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, औरंगाबादच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे पुण्यातून ३० एप्रिलला रवाना होणार आहेत.

राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी १ मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी पोलिसांच्या अटी-शर्थी

१) ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे.
२) लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी.
३) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
४) सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.
५) 1 मे रोजी महाराष्ट्रदिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये.
६) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
७) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये, वाहन पार्किंगचे नियम पाळावे.
८) सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
९) सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल.
१०) सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू रहाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!