Share

“…हे पवार साहेबच करू शकतात”, ‘त्या’ प्रकरणावरून निलेश राणेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ब्रिटिश काळात स्वातंत्र्य चळवळ दडपण्याच्या उद्देशाने भारतीय दंड संहितेत समाविष्ट करण्यात आलेल्या १२४-अ या राजद्रोहाच्या आरोपाच्या कलमाचा गैरवापर होत आहे. त्यामुळे या कलमाचा गैरवापर हा कायदादुरुस्तीद्वारे थांबवायला हवा किंवा हे कलमच रद्द करायला हवे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी म्हटले. यावरच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

“पवार साहेबांनी भीमा कोरेगाव कमिशनला पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये sedition देशद्रोह कायदा ब्रिटिश काळातला आहे, हा कायदा भारतीय नागरिकांच्या विरोधात ब्रिटिश वापरायचे म्हणून अशा कायद्याची गरज नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे. पण त्यांच्याच MVA सरकारने राणांना हाच कायदा लावला. हे पवार साहेबच करू शकतात.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगासमोर ११ एप्रिल रोजी दाखल केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी म्हटले होते की, “कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनाक्रमबद्दल माझ्याकडे व्यक्तिगत माहिती नाही. परंतु, या घटनेच्या अनुषंगाने भादंवि आणि फौजदारी दंड संहितेत काही  कायदादुरुस्ती होणे आवश्यक आहे, असे मला सुचवावेसे वाटते.”

दरम्यान हनुमान चालीसा प्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी राजद्रोहाचे कलम लावले आहे.  त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या या मताबाबत काल चर्चा झाली.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!