🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawli) यांचा श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाचा कारखाना असून यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचे अनुदान त्यांना दिले. मात्र अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरून न करता 7 कोटी रुपये मूल्य दाखवून दुसऱ्या एका संस्थेला विकला. या घोटाळयाप्रकरणी भावना गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप असून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी केली जात आहे.
दरम्यान भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावले असून पुढील आठवड्यात त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे . त्या चौकशीसाठी गेल्या नाहीत तर त्यांच्याविरोधात वॉरेंट निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे वॉरंट अजामीनपत्र असणार आहे.
दरम्यान पुढील आठवड्यात भावना गवळी यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. आता त्या चौकशीला हजार राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या माजी खासदार दिवंगत पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वांत लहान कन्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर कुणी मानसिक रोगी आहे”, जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- पुन्हा एकदा मास्क सक्ती?; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण
- “स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा…”, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला
- “बच्चा, बच्चा है बाप ‘बाप’ है” ; नवनीत राणांनी मोदींवर केली होती टीका, VIDEO व्हायरल
- “पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन”, संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
