मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशमध्ये ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देत असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माविआ सरकारवर टीका केली. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की, ‘कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कुणी मानसिक रोगी आहे’, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
कोणी योगी आहे
कोणी भोगी आहे
तर कुणी मानसिक रोगी आहे pic.twitter.com/cPcacvoiZJ— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2022
दरम्यान, ‘उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’. तसेच महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,’ असे राज ठाकरे योगी सरकारने केलेल्या भोंग्याच्या कारवाईवर बोलतांना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “…या विषयांवरून लक्ष उडविण्यासाठी पंतप्रधान वादग्रस्त विषयांना फोडणी देताय”, राऊतांचे टीकास्त्र
- “पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “बच्चा, बच्चा है बाप ‘बाप’ है” ; नवनीत राणांनी मोदींवर केली होती टीका, VIDEO व्हायरल
- “स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा…”, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला
- IPL 2022 DC vs KKR : कोलकाताचा अजून एक पराभव; दिल्लीसाठी कुलदीप पुन्हा ठरला गेमचेंजर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

