Share

IPL 2022 : विराट कोहलीचा ‘O Antava’ गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO घालतोय सोशल मीडियावर थैमान!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये बायो-बबलमध्येही खेळाडू खूप मजा करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नसोहळ्यात संघसहकाऱ्यांनी जबरदस्त डान्स केला. आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीही या सोहळ्यात काळा कुर्ता पायजमा घालून आला होता. त्याने शाहबाज अहमद आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिससोबत खूप मस्ती केली. संघातील इतर खेळाडूंनीही जोरदार डान्स केला. विराटच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या विराट कोहलीची बॅट शांत आहे. त्याने आयपीएलच्या ९ सामन्यात केवळ १२८ धावा केल्या आहेत. गेल्या तीन डावांत त्याला दोनदा खाते उघडण्यात अपयश आले आहे. अशा परिस्थितीत अनेक क्रिकेट तज्ज्ञ विराट कोहलीला आयपीएलमधून माघार घेण्याचा सल्ला देत आहेत. असे असतानाही आरसीबी संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याला सलामीला पाठवण्यात आले आहे. मात्र, तो केवळ ९ धावा करून बाद झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके झळकावणाऱ्या विराटने बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत अखेरचे शतक झळकावले होते. तेव्हापासून विराटला शतक करता आलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!