Share

“राज्याला जेवढा निधी मिळायला हवा, तेवढा मिळत नाही”, अजित पवारांचा केंद्रावर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (२७ एप्रिल) केला. यावर मविआ सरकारकडून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी राज्याला जेवढा निधी मिळायला हवा, तेवढा मिळत नाही असा आरोप केंद्रावर केला आहे.

जीएसटीच्या परताव्याबाबत पंतप्रधानांनी काही वक्तव्य केल्याचे माझ्या ऐकिवात आहे. जीएसटीचा परतावा पाच वर्षांसाठी ठरला होता, तो काळ आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे उरलेले जीएसटीचे पैसे पुढच्या दोन-तीन महिन्यात येतील, असे    अजित पवार यांनी म्हटले. तसेच राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही कर न वाढवता उलट गॅसवरील टॅक्स साडे तेरा टक्क्यांवरुन तीन टक्क्यावर आणला. एक हजार कोटींचा टॅक्स यासाठी राज्य सरकारने सोडला. असे अजित पवार यांनी म्हटले.

दरम्यान पेट्रोल आयात केल्यानंतर केंद्र सरकारपेक्षा महाराष्ट्राचा टॅक्स थोडा जास्त आहे, त्यावर आज चर्चा केली जाऊ शकते. तरीही हा अधिकार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला असतो, असे अजित पवारांनी सांगितले. पेट्रोल जेव्हा आयात केले जाते, तेव्हा त्यावर आधी केंद्र सरकार टॅक्स लावते, मग राज्य सरकारांकडून आपापला टॅक्स लावला जातो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे इथून खूप मोठ्या प्रमाणात कर देशाला जातो, हे निर्विवाद सत्य आहे. त्या तुलनेत राज्याला जेवढा निधी मिळायला हवा, तेवढा मिळत नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे. वन नेशन, वन टॅक्स ही संकल्पना जीएसटीच्या निमित्ताने पुढे आली. त्यामुळे केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवर टॅक्स लावताना एक मर्यादा आखून दिली, तर सर्व राज्य मिळून त्याबद्दल निर्णय घेऊ शकतात. राज्यांनाही त्यांचा कारभार करायचा असतो, अर्थचक्र सुरळीत चालवायचे असते. जीएसटी, एक्साईज, रेव्हेन्यू या ठराविक गोष्टीमधूनच आपल्याला टॅक्स मिळतो, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!