Share

“बुळबुळीत टोमणे मारण्याचे पेटंट फक्त मुख्यमंत्र्यांकडे”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला भातखळकरांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (२७ एप्रिल) पेट्रोल-डिझेलवरील कराच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या असल्याचा टोला लगावला. आता भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी यावर ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.

“त्याला टोमणे म्हणत नाहीत, पंतप्रधानांनी नाव घेऊन कानाखाली जाळ काढलाय. बुळबुळीत टोमणे मारण्याचे पेटंट फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांकडे आहे.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासंदर्भात मार्गदर्शन करणार होते. परंतु, कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या. त्यातून बिगरभाजपशासित राज्यांना टोमणा मारण्याचा त्यांचा हेतु होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील मराठी बाणा दाखवत मोदींना प्रत्युत्तर दिले.”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चोख उत्तर दिले. मुंबईत आज एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा, तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कराचा वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर, तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!