🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंगे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाकडून धार्मिक तेढ निर्माण करून राज्यातील कायदा-व्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे मविआ सरकारने म्हटले आहे. मात्र अशा संघर्षात राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी गावाकडील जत्रेचा व्हिडिओ शेअर करत आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. एकीकडे धार्मिक मुद्द्यावरून संघर्ष सुरु असताना गावाकडील जत्रेचा हा माहोल विरोधाभास निर्माण करतो.
“नारायणगावचे ग्रामदैवत आई मुक्ताबाई आणि काळोबा देवाचा जत्रोत्सव! लहानपणापासून हा जत्रोत्सव माझ्यासाठी श्रद्धेचा, आकर्षणाचा आणि अभिमानाचा विषय आहे. मंदिरातील आरास, भक्तिमय वातावरण, बाहेरच्या पटांगणातील पाळणे, शेव रेवडी-जिलेबीवर मारलेला ताव, नेत्रदीपक शोभेचे दारूकाम, तमाशा पंढरीतील तमाशा, आखाड्यात रंगणाऱ्या कुस्त्या… पिढ्या बदलत गेल्या, मनोरंजनाची नवनवीन साधनं आली तरी गावच्या जत्रोत्सवाची सर ना कुठल्या माॅलला ना अम्युझमेंट पार्कला!”, असे ट्वीट अमोल कोल्हे यांनी केले आहे.
तमाशा, आखाड्यात रंगणाऱ्या कुस्त्या … पिढ्या बदलत गेल्या, मनोरंजनाची नवनवीन साधनं आली तरी गावच्या जत्रोत्सवाची सर ना कुठल्या माॅलला ना अम्युझमेंट पार्कला!
ग्रामीण अर्थकारणाला गतिमान करणारं आणि त्याचवेळी मातीशी नाळ घट्ट करणारं हे या जत्रोत्सवाचं समीकरण स्तिमित करणारं आहे!— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 28, 2022
तसेच ग्रामीण अर्थकारणाला गतिमान करणारं आणि त्याचवेळी मातीशी नाळ घट्ट करणारं हे या जत्रोत्सवाचं समीकरण स्तिमित करणारं असल्याचेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मला राष्ट्रवादीकडून ऑफर” ; भाजप आमदार संजय सावकारे
- “GST चा निरर्थक मुद्दा पुढे करून मुख्यमंत्री…”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र
- “महाराष्ट्रात फक्त सत्तेचे भोगी” ; योगी सरकारने केलेल्या भोंग्यांच्या कारवाईवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया!
- “आमचे ९७ हजार कोटी द्या..”; ममता बॅनर्जींचा नरेंद्र मोदींना पलटवार
- “१९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच…”- गोपीचंद पडळकर आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
