Share

“काही लोक आपल्या दरम्यान असलेला बंधुभाव…”, दिलीप वळसे पाटलांचा विरोधकांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातर्फे काल (२७ एप्रिल) रमज़ान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार दावतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) थेट विरोधकांवर निशाणा साधत टीका केली. 

“काही लोक आपल्या दरम्यान असलेला बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करेल. सर्व लोकांनी शांतता कायम ठेवावी”, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले. तर सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, “देशात आज जे वातावरण आहे, जे चुकीचे घडत आहे त्याला रोखायला हवे. ‘हम सब एक है’ हा संदेश देत सर्वप्रथम आपण सर्व भारतीय आहोत ही भावना प्रत्येकाने बाळगायला हवी.”

तर शरद पवार यांनी म्हटले की, “राजधानी दिल्लीत एकप्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे सरकार आहे. पण दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातही कोणी सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्वांना मिळून तो प्रयत्न हाणून पाडावा लागेल.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!