Share

“बँड-बाजा, वरात-घोडा घेऊन आले नवरोजी अन् नवरीने दुसऱ्याशीच उरकले…”, वाचा एका अनोख्या लग्नाची गोष्ट 

Published On: 

🕒 1 min read

 बुलढाणा : लग्न हा क्षण प्रत्येक जोडप्यासाठी आयुष्यातील सर्वांत सुंदर आणि अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण असतो. मात्र या दिवशी अपेक्षाही केली नसेल असे काही घडले तर? असेच काहीसे झालेय ते बुलढाण्यातील एका जोडप्यासोबत. बुलढाणा  जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथे एका लग्न चार वाजताचे ठरले असताना वऱ्हाडी मंडळी पोहचली आठ वाजता आणि याचक्षणी होत्याचे नव्हते झाले.

नवरीकडील मंडळींनी नवरदेव यायला उशिर का झाला, म्हणून वराकडील मंडळीला विचारणा केली असता हा वाद वेगळ्याच मुद्द्यावर पोहोचला. आणि बघता बघता हातात स्वयंपाकाचे सराटे घेऊन वराकडील वर्‍हाडी मंडळीला चांगलेच चोपले. त्यानंतर  मुलीकडील परिवाराने लग्न लावायचेच नाही अशी रोखठोक भूमिका घेत नवरदेवाला भर मंडपातून माघारी पाठवले.

परंतु आता हळद लावलेल्या नवरीला ठेवायचे कसे या संकटात असताना वधुपित्याने शोधाशोध करून बीड येथील नात्यातील एक मुलगा बघितला आणि त्याच रात्री त्याच्यासोबत लग्न उरकून दिले. तर दुसरीकडे देऊळगाव कोळ येथील आत्याच्या मुली सोबत नवरदेवाचे देखील त्याच रात्री शुभमंगल उरकले. मात्र या घटनेने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!