Share

“कमी तिथे मोदी आणि मलई तिथे आम्ही”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचा हक्काचा आणि दर्जेदार कोळसा राज्याला नियमितपणे मिळेल यासाठी पाठपुरावा करा. तसेच  उरण येथील गॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी आपण स्वत: बोलू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे.

“राज्यात ९ हजार मेगावॅट औष्णिक वीज तयार करा, ऊर्जा विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री जींनी निर्देश दिले आहेत म्हणे. निर्देश दिले…काम संपले..!! आता पुढच्या व्हर्चुअल मिटिंगपर्यंत वामकुक्षी घ्यायला मुख्यमंत्रीजी मोकळे. बाकी कमी तिथे मोदी आणि मलई तिथे आम्ही…हे सुरूचं”, असा टोला चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लगावला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे?

राज्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेत ९ हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून तातडीच्या उपाययोजना करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वीज टंचाईवर मात करण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालिक अशा दोन्ही उपाययोजना करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!