Share

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या रेणू शर्माला अटक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करणार असल्याचे रेणू शर्माने म्हटले होते. धनंजय मुंडे यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. आता मुंबईच्या गुन्हे शाखेने तिला आज अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.

रेणू शर्मा ही मूळ इंदौर येथील असून करुणा शर्मा यांची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून इंदौर कोर्टात हजर केले होते. इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला असून आज (२१ एप्रिल) तिला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धनजंय मुंडे यांनी तक्रारीत आपण सदरील महिलेला ओळखत असल्याचे म्हटले होते. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले असून एक मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता, असे  धनजंय मुंडे यांनी म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?

धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार या महिलेने याअगोदरही ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतरच्या काळात तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन केला. यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांचे दुकान आणि मोबाईलची मागणी केली.  मागणी पूर्ण न केल्यास बदनामी करण्याची धमकी या महिलेने दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी या महिलेची तक्रार मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!