🕒 1 min read
मुंबई: हातात कायद्याचे पुस्तक नाचवत, अंगावर वकिलीचा काळा डगला चढवून गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) या महाशयांनी राज्यात जो खेळ चालवला होता, तो शेवटी कायद्यानेच संपवला आहे. सदावर्ते यांच्या आतंकवादी वागण्याने शंभरावर एस.टी. कर्मचाऱ्यांना कायमचे नोकरीस मुकावे लागले. या कर्मचाऱ्यांची कुटुंबे आता सदावर्ते पोसणार आहे काय? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सामना अग्रलेखातून केला आहे.
“नेतृत्व संयमी नसले की, कामगारांची व जनतेची काय ससेहोलपट होते हे सदावर्ते प्रकरणात दिसले. ‘डंके की चोट पर’ हा गुणरत्न सदावर्तेचा परवलीचा शब्द होता. आज सदावर्तेची वरात या न्यायालयातून त्या न्यायालयात, या पोलीस स्टेशनातून त्या पोलीस स्टेशनात सुरू आहे. सदावर्तेला गाढवांची आवड होती. त्याने गाढव पाळले, पण या महान गाढवप्रेमींना कोण पाळत होते हेसुद्धा लोकांसमोर यायलाच हवे. सदावर्ते जेलातून, पोलीस स्टेशनातून बाहेर येताना उदयनराजेंप्रमाणे ‘कॉलर’ उडवताना दिसतो व ‘भारतमाता की जय’ अशी विजयाची खूण दाखवत गर्जना करतो. हा विनोदच आहे.”, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, “कायदा हा सामान्यांची कवचकुंडले असतो. सदावर्तेसारखे लोक कायदा आणि संविधानाचा गैरवापर करतात व सामान्यांना देशोधडीस लावतात. “कायदा गाढव असतो” अशा अर्थाची एक म्हण आहे. सदावर्तेसारखे लोक गाढवच आपल्या दारात बांधतात व मुक्या मेंढरासारखी जनता त्या गाढवाची पूजा करते. गाढव तुरुंगात जाताच ‘लाल परी’ मुक्त झाली, गावागावांत धावू लागली!”
तसेच गुणरत्न सदावर्ते त्यांच्याच कर्माची फळे भोगत तुरुंगात पडले आहे. अनेक जिल्ह्यांत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने या महाशयांची गावभर वरात काढली जात असल्याचे चित्र दिसत आहे. एक मात्र नक्की, सदावर्तेची वरात निघाल्यापासून एस. टी. वेगात सुरू झाली आहे व आतापर्यंत 75 हजार एस.टी. कर्मचारी डयुटीवर रुजू झाले आहेत. सदावर्तेच्या झुंडशाहीस चार महिने आधीच लगाम घातला असता तर एस.टी. संप इतका चिघळला नसता, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…आणि ‘लाल परी’ मुक्त झाली! गाढवांचे काय?”, ‘सामना’तून संजय राऊतांचा प्रहार
- “५ कोटी द्या; अन्यथा बलात्काराची तक्रार दाखल करणार”, धनंजय मुंडेंना महिलेची धमकी
- “सदावर्तेच्या झुंडशाहीस चार महिने आधीच लगाम घातला असता तर…”, संजय राऊतांचा प्रहार
- IPL 2022 DC vs PBKS : पंजाब किंग्जचा फुसका बार..! दिल्लीनं सहज जिंकला सामना; वॉर्नरची हॅट्ट्रिक!
- पोलार्डतात्या निवृत्त..! IPL 2022 दरम्यान घेतला ‘धक्कादायक’ निर्णय; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
