Share

“कुणाला वाटत असेल द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल पण…”, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या मविआ विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष पेटताना दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. राज ठाकरे भाजपच्या वळणावर असून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला  जात असल्याचे मविआ सरकारने म्हटले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांनी ट्वीट करत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.

“मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळं बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरुन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधं यासाठी हातात हात घालून लढत होतो. म्हणून माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावलं. पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत.”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

कुणाला वाटंत असेल ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल किंवा काहींना वाटंत असेल आपली राजकीय भाकरी भाजेल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसं होऊ देणार नाही. फक्त मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी! असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!