Share

IPL 2022 LSG vs RCB : मॅचही गेली अन् पैसेही..! लखनऊचा कप्तान केएल राहुलला दंड; चूक नडली!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला दुहेरी धक्का बसला आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या (LSG vs RCB) सामन्यात लखनऊचा संघ १८ धावांनी पराभूत झाला. यानंतर राहुलला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

राहुलने आयपीएलच्या आचारसंहितेच्या लेव्हल-१ अंतर्गत चूक मान्य करत त्याच्यावर लावण्यात आलेला दंडही स्वीकारला आहे. राहुल व्यतिरिक्त, लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसलाही या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे.

असा रंगला सामना…

कप्तान फाफ डु प्लेसिसची ९६ धावांची खेळी आणि जोश हेझलवूडने घेतलेल्या ४ विकेट्सच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG vs RCB ) १८ धावांनी पराभव केला. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या विजयासह बंगळुरूचा संघ गुणतालिकेत १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!