Share

दिल्लीत कोरोना वाढला; राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती!

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या वाढत्या केसेस संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या १३५ केसेस आहेत, त्यापैकी ८५ केसेस मुंबईत आहेत. महाराष्ट्राने याआधी चाळीस हजाराहून अधिक केसेस दररोज पाहिल्या आहेत. त्यामुळे आताची परिस्थिती ही नियंत्रणात आहे. कोणतेही घाबरण्याचे कारण नाही. लसीकरण झाल्यामुळे सुरक्षा कवच मिळाले आहे. तसेच १२ ते १८ वर्षांच्या वयोगटातील लहान मुलांमध्ये लसीकरण वाढावे यासाठी प्रबोधन करत आहोत”.

बुस्टर डोस आपण स्वतःहून देत नाही आहोत. पण ज्यांच्यात अँटीबॉडीज कमी असतील त्यांनी खासगी रुग्णालयातून बुस्टर डोस घेण्यास अडचण नाही. आज काळजी करण्याचा कोणताही विषय नाही. मास्क सक्ती आपण हटवली आहे, त्यासाठी दंड लावला जात नाही. मात्र कॉमोर्बिटिज असलेल्या लोकांनी मास्क वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.

पाश्चिमात्य देशात काही प्रमाणात केसेस वाढत आहेत. दिल्लीतही केसेस वाढलेल्या दिसत आहेत. आयसीएमआर, केंद्र सरकार आणि राज्याचा आरोग्य विभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!