Share

“…यावर पवार कुटुंबीयांनी सखोल चिंतन करावं”, रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला सदाभाऊंचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा आणि त्यानंतरच्या उत्तर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्ला केला. राष्ट्रवादीने राज्यात जातीचे राजकारण केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. तर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांनी ‘शरद पवार, अजित दादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखे आहे.’, असे म्हटले होते. यावरच आता माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

शरद पवार, अजित दादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखे इति रोहित पवार. मात्र महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे स्वराज्य हाच जीव की प्राण मानणारी छत्रपती शिवाजी महाराजांची! पवार कुटुंबीयांनी कधी यावर सखोल चिंतन करावं”, असा सल्लाही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते रोहित पवार?

शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट करणे म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करणे आहे. लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही, त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून, मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या:  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!