Share

IPL 2022 RR vs GT : हार्दिकसेना पहिल्या क्रमांकावर विराजमान; बलाढ्य राजस्थानला चारली धूळ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२मध्ये अजून एक विजय नोंदवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगेलल्या सामन्यात गुजरातने संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला ३७ धावांनी पराभूत केले. या सामन्यात सॅमसनने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कप्तान हार्दिक पंड्याच्या दमदार ८७ धावांच्या जोरावर गुजरातने राजस्थानला १९३ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १५५ धावांपर्यंतच पोहोचू शकला.

राजस्थानचा डाव

स्फोटक फलंदाज जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी राजस्थानच्या़ डावाची सुरुवात केली. वेगवान गोलंदाज यश दयालने पडिक्कलला खातेही खोलू दिले नाही. त्यानंतर बढती मिळालेल्या रवीचंद्रन अश्विनही (८) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. बटलरने एका बाजूने धावा करत अर्धशतक ठोकले. त्याने २४ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. लॉकी फर्ग्युसनने त्याचा त्रिफळा उडवत राजस्थानला संकटात टाकले. कप्तान संजू सॅमसनला (११) कप्तान पंड्याने धावबाद केले. शिमरॉन हेटमायरने २९ धावांचे योगदान दिले. मोहम्मद शमीने त्याला तंबूत पाठवत राजस्थानची मधली फळी संपुष्टात आणली. त्यानंतर आलेले जिमी नीशम आणि रियान पराग यांना मोठे फटकेबाजी करता आली नाही आणि राजस्थानचा विजय लांबला. २० षटकात राजस्थानला ९ बाद १५५ धावांपर्यंतच पोहोचता आले. गुजरातकडून यश दयालने ३ बळी घेतले.

गुजरातचा डाव

मॅथ्यू वेड आणि शुबमन गिल यांनी गुजरातसाठी सलामी दिली. वेड (१२) धावबाद होऊन तंबूत परतला, तर रियान परागने शुबमनला (१३) झेलबाद केले. त्यानंतर आलेला विजय शंकर (२) कुलदीप सेनचा बळी ठरला. त्यानंतर कप्तान हार्दिक पंड्या आणि अभिनव मनोहर यांनी संघासाठी अर्धशतकी भागीदारी केली. हार्दिकने १४व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. अभिनवने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावांचे योगदान दिले. युझवेंद्र चहलने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरने हार्दिकसोबत जलद धावा केल्या. २० षटकात गुजरातने ४ बाद १९२ धावा केल्या, मिलरने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या. तर कप्तान पंड्याने ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८७ धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!