🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मधील म्हणजेच १५व्या मोसमात मुंबई इंडियन्सने सलग पाचवा सामना गमावला आहे. काल बुधवारी मुंबईला पंजाब किंग्जकडून पराभवाला सामोरे जावे लागले. रोहितसेनेच्या पाचव्या पराभवानंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे. तो म्हणजे मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकेल का?
२०१५च्या हंगामातही मुंबई संघाने पहिल्या ६ पैकी फक्त एकच सामना जिंकला होता. त्या हंगामातही रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळत होता. त्यानंतर मुंबई संघाने उत्तम रणनिती अवलंबत शानदार पुनरागमन केले आणि त्यानंतर त्या मोसमात प्लेऑफ गाठून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
२०२२ च्या मोसमात मोठा बदल झाला आहे. यावेळी दोन नवीन फ्रेंचायझींची भर पडल्याने एकूण १० संघ झाले आहेत. २०१५च्या मोसमात फक्त ८ संघ होते. मात्र, १० संघ असूनही यावेळीही प्रत्येक संघाला गटात १४-१४सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत मुंबई संघाला चालू मोसमातही अंतिम सामना खेळायचा असेल आणि चॅम्पियन व्हायचे असेल तर २९१५ च्या फॉर्म्युल्याप्रमाणे पुढील सर्व सामने जिंकावे लागतील.
मुंबईचा संघ पुढील नऊ पैकी एक किंवा दोन सामने हरला तर त्याला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी नेट रनरेट आणि उर्वरित संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागेल. मुंबई संघाने आतापर्यंत सर्वाधिक वेळा (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०) विजेतेपद पटकावले आहे. मुंबई संघाला आता लखनऊ आणि चेन्नईविरुद्ध २-२ सामने खेळायचे आहेत. याशिवाय राजस्थान, गुजरात, कोलकाता, हैदराबाद आणि दिल्ली विरुद्ध १-१सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- व्वा क्या सीन है…! पाकिस्तानच्या खेळाडूसोबत क्रिकेट खेळतोय भारताचा ‘स्टार’ फलंदाज; पाहा PHOTO!
- JALGAON | दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है जिंदगी भर के लिये बदनाम किया है – एकनाथ खडसे
- IPL 2022 : CSK पाठोपाठ टीम इंडियालाही धक्का..! आता काय करणार रोहित शर्मा?
- आंबेडकर जयंतीला डॉल्बी लावण्यावर बंदी, नागरिकांचा रास्ता रोको
- IPL 2022 : हिटमॅन बनला दहा हजारी मनसबदार..! फॉर्मात नसलेल्या रोहितची टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी
- IPL 2022 : जे कोणालाही जमलं नाही ते ‘गब्बर’नं करून दाखवलं; मुंबईविरुद्ध धवननं रचला वर्ल्ड रेकॉर्ड!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
