Share

“आमचे खेळाडू IPLमध्ये आनंदानं खेळतायत आणि…”, श्रीलंकेच्या माजी कर्णधारानं नाव न घेता सुनावलं!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : श्रीलंका देशाची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत आणि अनेक माजी क्रिकेटपटूही त्यांना पाठिंबा देत आहेत, त्यात सनथ जयसूर्या, मारवान अटापट्टू या दिग्गज खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. तर सध्याच्या अनेक खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामात अनेक श्रीलंकेचे खेळाडू आणि माजी खेळाडू प्रशिक्षक म्हणून सहभागी होत आहेत. अर्जुन रणतुंगाने त्या खेळाडूंबद्दल टोमणे मारत मोठे विधान केले आहे.

रणतुंगाने म्हटले, ”असे काही क्रिकेटपटू आहेत जे आयपीएलमध्ये आनंदाने खेळत आहेत आणि आपल्या देशाबद्दल बोलत नाहीत. दुर्दैवाने लोक सरकारविरोधात बोलायला घाबरतात. हे क्रिकेटपटू मंत्रालयांतर्गत क्रिकेट बोर्डासाठीही काम करत आहेत आणि आपली नोकरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

”जेव्हा काही चुकीचे घडत असेल, तेव्हा तुमच्या व्यवसायाचा विचार न करता समोर येऊन त्याविरुद्ध बोलण्याचे धैर्य असले पाहिजे. लोक मला विचारतात की मी विरोध का करत नाही. एकच गोष्ट आहे की मी गेली १९ वर्षे राजकारणात आहे आणि हा राजकीय मुद्दा नाही. आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने आणि राजकारण्याने आंदोलनात भाग घेतला नाही आणि हीच या देशातील जनतेची सर्वात मोठी ताकद आहे”, असेही रणतुंगाने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!