🕒 1 min read
मुंबई : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टवर एक धक्कादायक खुलासा केला होता. ”मुंबई इंडियन्सकडून खेळताना ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंड्स आणि न्यूझीलंडचा जेम्स फ्रँकलिन या दोघांनी माझे हात-पाय बांधून, तोंडाला टेप लावून मला रुममध्ये सोडून गेले होते”, असे चहलने सांगितले होते.
आता डरहॅमने या प्रकरणाबाबत एक निवेदन जारी केले आहे. जेम्स फ्रँकलिनच्या भूमिकेबाबत ते या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व सदस्यांची चौकशी करत आहेत. न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू फ्रँकलिनची जानेवारी २०१९मध्ये डरहमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
२०११च्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेदरम्यान ही घटना घडली होती. त्या काळात सायमंड्स, फ्रँकलिन आणि चहल हे मुंबई इंडियन्सच्या संघात होते. फ्रँकलिन आणि अँड्र्यू सायमंड्सने त्याला रात्रभर बांधून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सफाई कर्मचाऱ्यांपैकी कोणीतरी येऊन त्याला शोधले.
चहलच्या म्हणण्यानुसार, या घटनेबद्दल दोघांनीही त्याची माफी मागितलेली नाही. चहलने काही महिन्यांपूर्वी या घटनेचा उल्लेख केला होता परंतु अलीकडेच राजस्थान रॉयल्सचा संघसहकारी अश्विनशी झालेल्या संभाषणात त्याने आणखी एका घटनेचा खुलासा केला. एका खेळाडूने मला १५व्या मजल्यावर लटकवले होते, असे चहलने म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : RCBचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन; मुंबईविरुद्धची मॅच खेळताना समजली वाईट बातमी!
- “राज्यातले भाजपचे नेते कायद्याची ऐशी तैशी करायला निघालेत”; नाना पटोलेंचा घणाघात
- “…तो मुद्दाम चित्रित केलाय”, कीर्तनकारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया
- “शरद पवारांमुळेच मी इथं”; नवनीत राणांनी उधळली स्तुतीसुमने
- “…तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली”, यशवंत किल्लेदारांचा शिवसेनेवर हल्लाबोल
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
