Share

IPL 2022 RCB vs MI : मी आहे ना..! सूर्यकुमार यादवचा ‘वन मॅन शो’; बंगळुरूला १५२ धावांचं आव्हान!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सूर्यकुमार यादवच्या (नाबाद ६८) वन मॅन शोमुळे मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १५२ धावांचे आव्हान दिले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. चांगल्या सुरुवातीनंतर अवघ्या २९ धावांत ६ फलंदाज गमावलेल्या मुंबईला सूर्यकुमारने आधार दिला. त्याने नाबाद खेळी करत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

मुंबईचा डाव

कप्तान रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईसाठी अर्धशतकी सलामी दिली. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने रोहितला फसवले. रोहितने ४ चौकार आणि एका षटकारासह २६ धावा केल्या. त्यानंतर मात्र चित्र पालटले. मुंबईचे इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, कायरन पोलार्ड, तिलक वर्मा आणि रमनदीप सिंह अवघ्या २९ धावांत तंबूत परतले. मग एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या सूर्यकुमारने धावगती वाढवली. त्याने दर्जेदार फलंदाजी करत मुंबईला दीडशेपार पोहोचवले. सूर्यकुमारने ५ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ६८ धावा तडकावल्या. २० षटकात मुंबईने ६ बाद १५१ धावा फलकावर लावल्या. आरसीबीकडून वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी २-२ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing XI

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, रमणदीप सिंग, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!