🕒 1 min read
मुंबई: युजवेंद्र चहलच्या मुंबई इंडियन्ससंबधी खुलास्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीवीर म्हणून फलंदाजी करणाऱ्या रॉबिन उथप्पानेही एक घटना सांगितली आहे. त्याने आयपीएलमधील त्याच्या सर्वात वाईट टप्प्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्याच्यावर मुंबई इंडियन्सने दुसऱ्या संघात जाण्यासाठी दबाव टाकला होता, असा धक्कादायक खुलासा उथप्पाने केला.
रॉबिन उथप्पाने (Robin uthappa) सांगितले की त्याला आयपीएल २००९ दरम्यान त्याच्या कारकिर्दीच्या सर्वात वाईट टप्प्यातून जावे लागले. २००८ मध्ये, तो मुंबई इंडियन्सकडून (MI) खेळला आणि पुढच्या हंगामात त्याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये (RCB) बदली झाली. मुंबईहून आरसीबीमध्ये जाण्यास तो अजिबात सहमत नव्हता, परंतु असे असतानाही त्याच्यावर त्यावेळी ट्रान्सफर पेपरवर सही करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. ‘मी ट्रान्सफर पेपरवर सही करायला तयार नव्हतो. मुंबई इंडियन्समधील कोणीतरी मला सांगितले की जर मी पेपरवर सही केली नाही तर मला MIच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही.”
आरसीबीमध्ये गेल्यावर तो सुरुवातीला डिप्रेशनमध्ये होता असे उथप्पाने यावेळी सांगितले. ‘मला असे वाटले की मी आरसीबीच्या सर्वोत्तम काळात त्यांच्यासह खेळलो. आयपीएलचा हा एक टप्पा होता जिथे पहिले वर्ष खूप मजेदार होते कारण प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. आयपीएलमध्ये बदली झालेल्या पहिल्या लोकांपैकी मी एक होतो. माझ्यासाठी, ते खूप कठीण होते कारण त्या वेळी माझी MI सोबतची निष्ठा पूर्णपणे स्थिरावली होती. हे आयपीएलच्या एक महिना आधी घडले आणि मी ट्रान्सफर पेपरवर सही करण्यास नकार दिला.”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “मुंह में फुले-शाहू बगल में चावल…”, भातखळकरांनी साधला भुजबळांवर निशाणा
- IPL 2022: आज अजिंक्य गुजरातला पंजाब संघ भिडणार; जाणून घ्या कोणता संघ ठरेल वरचढ
- अबब.. आयएनएस विक्रांतसाठी तब्बल इतक्या कोटींचा निधी
- “वाचाळ आणि गचाळ बडबड दुसरं काही नाही”, संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर राम सातपुतेंचा टोला
- IPL 2022: दिल्लीचा दुष्काळात तेरावा महिना; पराभवानंतर कर्णधार ऋषभला भरावा लागणार लाखोंचा दंड!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
