Share

“मर्दानी मराठी भाषेचे भवन उभे राहतेय यात अडथळा आणाल तर…”, शिवसेनेचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवरायांचा मावळा राष्ट्राच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावतो असेच इतिहास सांगतो. जिवाची बाजी लावून जो राष्ट्राचे रक्षण करतो, त्या वीरांची भाषा मराठी. बाबरीवर हातोडे मारून पुन्हा “होय, बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे,” असे ठणकावणारे मर्द सेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषा मराठी. “अमरनाथ यात्रेकरूंच्या केसाला हात लावाल तर याद राखा” या इशाऱ्याने पाकड्या दहशतवाद्यांना धडकी भरवणारी भाषा मराठी. अशा मर्दानी मराठी भाषेचे भवन उभे राहत आहे. या कार्यात अडथळा आणाल तर याद राखा! असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सामना अग्रलेखातून दिला आहे.

महाराष्ट्राच्या राजधानीत, आपल्या मुंबई शहरात मराठी भाषा भवन उभे राहत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी भाषा भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. केंद्र सरकार मराठीच्या बाबतीत द्वेषाने वागत आहे. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शर्थ सुरू आहे, पण मराठीच्या नशिबी नकारघंटाच येत आहे. आता मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी मराठी भाषा भवन दिमाखात उभे राहत आहे. ठाकरे सरकारने हे उत्तम काम केले. केंद्रास मराठी भाषेबाबत ऐतिहासिक, प्राचीन, अर्वाचीन पुरावे हवे असतील तर या वास्तूत त्यांना अभ्यास करता येईल. मरीन लाइन्स ही अतिश्रीमंत लोकांची जहागिरी आहे. येथे मराठी माणूस अभावानेच आढळतो.

मराठी ही कष्टकऱ्यांची, लढवय्यांची भाषा. मराठी म्हणजे छत्रपती शिवरायांपासून ते क्रांतिवीरांची भाषा. मुंबई महाराष्ट्रात यावी व मराठी भाषिकांचे एक अखंड राज्य निर्माण व्हावे यासाठी जे 105 हुतात्मे कामी आले, त्या हुतात्म्यांची भाषा मराठी. संत ज्ञानोबा, तुकारामाची भाषा मराठी. गांधीजींनी मुंबईत ‘चले जाव’चा नारा देताच हजारो गिरणी कामगार रस्त्यावर उतरले, त्या लढवय्यांची भाषा मराठी. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर प्राणत्याग करणाऱ्यांची भाषा मराठी. अनेक आक्रमणे पचवून जी भाषा उभी आहे, त्या मराठी भाषेचे भवन मुंबईत निर्माण व्हावे व उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना मराठीची ही पताका फडकावी हे महत्त्वाचे प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आता उद्धव ठाकरे अशा तीन पिढ्या ‘मराठी’ साठी लढा देत आहेत. याचा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!