🕒 1 min read
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना इडीने दाऊद यांच्या निकटवर्तीयांकडून मालमत्ता खरेदी प्रकरणात अटक केली आहे. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांवर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यावरून राज्याचं राजकारण बरंच तापलं होतं.
मागील अनेक दिवसांपासून नवाब मलिक हे जमीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु त्यांना दिलासा मिळू शकलेला नाही. त्यातच आता न्यायालयाने मलिकांची कोठडी अठरा एप्रिल पर्यंत वाढवली आहे. म्हणून आता आणखी दोन आठवडे मालिकांना कोठडीत राहावे लागणार आहे.
इडीने आपल्यावर केलेली कारवाई ही चुकीची असून, त्या विरोधात मलिकांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. न्यायालयाने मलिकांची याचिका फेटाळून लावली होती. यामुळे मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली होती. आता मलिकांना पुन्हा जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना सल्ला; म्हणाले, “त्यांनी आपल्या नवीन बंगल्यात आंबेडकरांची प्रतिमा लावुन…”
मनसेने शिवसेनेचा ‘वीरप्पन गँग’ म्हणून केला उल्लेख; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
उद्यापासून रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार; तब्बल ५९ वर्षांनी मिळालाय सातारकरांना मान!
“…तर आम्ही एक मिनिटात पलटी मारतो”; सुजय विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
VIDEO : करियरच्या शेवटच्या मॅचमध्ये रॉस टेलरला अश्रू अनावर; रडता रडता सोडलं मैदान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
