🕒 1 min read
मुंबई : IPL 2022 अतिशय धमाकेदार स्टाईलमध्ये खेळवला जात आहे. या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पूर्णपणे बदललेला दिसत आहे. आता आयपीएलच्या मध्यावर आरसीबीचा एक खेळाडू संघाबाहेर पडला आहे. तर त्याजागी एका महान खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे.
आरसीबीचा दुखापतग्रस्त लवनीत सिसोदियाच्या (lavneet sisodia) जागी फलंदाज रजत पाटीदारचा (rajat patidar) आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघात समावेश करण्यात आला आहे. आरसीबीने रविवारी ही माहिती दिली. त्याने ३१ T20I मध्ये १३८.६४ च्या स्ट्राइक रेटने सात अर्धशतकांच्या मदतीने ८६१ धावा केल्या आहेत.
रजत पाटीदार २० लाख रुपयात आरसीबीमध्ये समावेश होईल. विशेष म्हणजे यंदा मेगा ऑक्शनमध्ये तो अनसोल्ड राहिला होता. पाटीदारने गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याचे चांगले प्रदर्शन असूनही तो अनसोल्ड राहणे धक्कादायक होते. आता मात्र त्याला पुन्हा आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 CSK vs PBKS : लिव्हिंगस्टोनची वादळी खेळी; पंजाबचं चेन्नईला १८१ धावांचं आव्हान!
- IPL 2O22 : जोस बटलरनं ठोकलं शतक; क्रेडिट कोणाला दिलं माहितीये? वाचून हसाल!
- “…तर नरेंद्र मोदींशीवाय पर्याय नाही”; संजय राऊतांचा जुना व्हिडीओ व्हायरल
- IPL 2022: पंजाबचा विस्फोटक फलंदाज ओडियन स्मिथ आहे हिटमॅनचा फॅन; म्हणाला “मला त्याच्यासारखं खेळायचंय…”
- IPL 2022 : धोनी म्हणजे वीजच…! पंजाबच्या फलंदाजाला ‘महाप्रचंड’ वेगानं केलं रनआऊट; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
