Share

IPL 2022 : धोनी म्हणजे वीजच…! पंजाबच्या फलंदाजाला ‘महाप्रचंड’ वेगानं केलं रनआऊट; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात चेन्नईचा कप्तान रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने पंजाबचा कप्तान मयंक अग्रवालला दुसऱ्याच चेंडूवर बाद केले. यानंतर धोनीने पंजाबच्या दुसऱ्या फलंदाजाला अप्रतिम पद्धतीने धावबाद केले.

वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पंजाबचा फलंदाज भानुका राजपक्षे धावबाद झाला. चोरटी धाव घेण्याच्या नादात राजपक्षेला मोठी किंमत चुकवावी लागली. राजपक्षे पहिली धाव घेण्यासाठी धावला, खरा पण दुसऱ्या बाजूला असलेल्या शिखर धवनने नकार दिला. तोपर्यंत जॉर्डनने चेंडू धोनीकडे फेकला होता, तेव्हा धोनीने सूर मारत राजपक्षेला धावबाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कप्तान), महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी.

पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा.

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!