Share

“…तर नरेंद्र मोदींशीवाय पर्याय नाही”; संजय राऊतांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असं वादग्रस्त राजकारण पाहायला मिळत आहे. त्यात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची एकेमकांवर सतत टोलेबाजी सुरु असताना पाहायला मिळते. अशातच संजय राऊतांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते प्रचंड ट्रोल होत असताना पाहायला मिळत आहे.
https://www.facebook.com/SumitMns/posts/5154826941259773
हा व्हिडीओ नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीचा आहे. या व्हिडीओत संजय राऊत बोलत आहेत कि, “आपल्याला आयोध्येच राममंदिर हवं असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. आणि फक्त आयोध्येत राम मंदिर नकोय. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर लाहोर आणि कराचीमध्ये पण आम्ही त्याच पद्धतीने राम मंदिर बांधू. कारण आता पाकिस्तान फार काळ राहणार नाही”. या वक्तव्यांमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरु असताना दिसत आहेत.
संजय राऊतांचा हा जुना व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित खांबेकर यांनी “पोपटाची अक्कल दाढ” असे कॅप्शन देत त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. या पोस्टमधून मनसेने राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे लागतील” – राज ठाकरे
“छळ करून कोणी दहशतवादी होत नाही..” विवेक अग्निहोत्रींचा व्हिडिओ व्हायरल
IPL 2022: गुजरात सोबतची कामगिरी बघता हार्दिकची लागू शकते लॉट्री! T20 WCसाठी मार्ग मोकळा
“तुम्ही मध्यस्थी करा मुख्यमंत्र्यांना समजावा…” – फडणवीसांची अशोक चव्हाणांना विनंती
“राष्ट्रवादी शिवसेनेसोबत कधीच सरकार…”; शरद पवारांचा भुवया उंचावणारा व्हिडीओ व्हायरल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!