Share

IPL 2022 CSK vs PBKS : लिव्हिंगस्टोनची वादळी खेळी; पंजाबचं चेन्नईला १८१ धावांचं आव्हान!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात चेन्नईचा कप्तान रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. लियाम लिव्हिंगस्टोनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने चेन्नईला १८१ धावांचे आव्हान दिले आहे. एकावेळी पंजाब सहज दोनशे धावंसंख्या गाठेल, असे वाटत होते, पण चेन्नईच्या गोलंदाजांनी शेवटच्या तीन षटकात जास्त धावा दिल्या नाहीत.

पंजाबचा डाव

पंजाबचा कप्तान मयंक अग्रवालला (४) दुसऱ्याच चेंडूवर तंबूत पाठवत वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने चेन्नई सुपर किंग्जला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षेला (९) महेंद्रसिंह धोनीने चपळतेने धावबाद केले. दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि शिखर धवन यांनी संघाला शतकापार नेले. लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६० धावा चोपल्या. तर धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावांचे योगदान दिले. जडेजाने लिव्हिंगस्टोनला तर ब्राव्होने धवनला बाद केले. हे दोघे माघारी परतल्यानंतर पदार्पणवीर जितेश चौधरीने २६ धावांची मनोरंजक खेळी केली. आगळावेगळा फटका खेळण्याच्या नादात जितेशने विकेट फेकली आणि पंजाबच्या डावाला उतरता कळा लागली त्यामुळे पंजाबला दोनशेपार जाता आले नाही. २० षटकात पंजाबने ८ बाद १८० धावा केल्या. चेन्नईकडू ख्रिस जॉर्डन आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कप्तान), महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी.

पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा.

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!