🕒 1 min read
मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा (MI vs RR) २३ धावांनी पराभव केला. या सामन्यात जॉस बटलरने शतक झळकावत संघाची धावसंख्या १९३ नेली होती. मुंबईला मोठे लक्ष्य देऊन विजय मिळविल्यानंतर बटलर युझवेंद्र चहलसोबत गप्पा मारताना दिसला. यादरम्यान, बटलरने त्याच्या शतकामागचे मजेशीर कारण सांगितले आहे.
जोस बटलरने (jos buttler) त्याच्या शतकी खेळीबद्दल सांगितले की, प्रथम फलंदाजी करताना खूप मजा आली. आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर युझवेंद्र चहलसोबत (yuzvendra chahal) बोलताना पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जोस बटलर म्हणाला, “नक्कीच! या वर्षी आल्यापासून तु ओपनिंग स्पॉटसाठी जोर लावत आहेस. तुला बाहेर ठेवण्यासाठी काही धावा करण्याची गरज होती. आज खरच मजा आली. जेव्हा तुम्ही प्रथम फलंदाजी करता तेव्हा चांगली धावसंख्या कोणती असेल हे शोधण्याचा प्रयत्न करा आणि मला वाटले की आम्ही चांगली धावसंख्या केली आहे.”
बटलरने यावेळी मजेशीरपणे त्याचे शतक चहलमुळे झाल्याचे सांगितले. यामागचे कारण म्हणजे एकदा युझीने मजेतच मला बटलरच्या जागी ओपनिंग करू द्या असे राजस्थानच्या सोशल मीडियावर सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या या संभाषणाने सगळ्यांना हसू सुटले आहे. बटलर फलंदाजीने तर युझी गोलंदाजीने राजस्थान संघाला स्पर्धेत यश मिळवून देत आहेत.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “…तर नरेंद्र मोदींशीवाय पर्याय नाही”; संजय राऊतांचा जुना व्हिडीओ व्हायरल
- IPL 2022: पंजाबचा विस्फोटक फलंदाज ओडियन स्मिथ आहे हिटमॅनचा फॅन; म्हणाला “मला त्याच्यासारखं खेळायचंय…”
- IPL 2022 : धोनी म्हणजे वीजच…! पंजाबच्या फलंदाजाला ‘महाप्रचंड’ वेगानं केलं रनआऊट; पाहा VIDEO!
- IPL 2022 दरम्यान रोहित शर्माचा धक्कादायक खुलासा..! म्हणाला, “….तेव्हा मी एक महिना डिप्रेशनमध्ये होतो”
- IPL 2022 CSK vs PBKS : चेन्नईनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing XI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
