Share

IPL 2022 दरम्यान रोहित शर्माचा धक्कादायक खुलासा..! म्हणाला, “….तेव्हा मी एक महिना डिप्रेशनमध्ये होतो”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल म्हणजेच २ एप्रिल रोजी चाहत्यांनी आणि क्रिकेटच्या दिग्गजांनी २०११ च्या विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाची ११ वी अँनिव्हर्सरी साजरा केली. तेव्हा अनेक दिग्गजांनी विश्वचषकाविषयी आपल्या आठवणी सांगितल्या. मात्र यावेळी टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या आठवणी सांगताना आपली व्यथा मांडली आहे. २०११ च्या विश्वचषकात रोहित शर्माचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करून दुसऱ्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या नामांकित संघात प्रतिभा असूनही रोहितचे नाव नव्हते.

२०११ च्या विश्वचषकातील क्षणांची आठवण करून देत, रोहित शर्माने (rohit sharma) त्या काळात १ महिना डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले, “तो खूप कठीण काळ होता. खरे सांगायचे तर, हे सोपे नाही कारण विश्वचषक ही अशी गोष्ट आहे जी खेळण्याचे आणि त्याचा एक भाग बनण्याचे तुम्ही नेहमीच स्वप्न पाहता. मला अजूनही आठवते की मी त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत होतो आणि आम्हाला ही बातमी मिळाली तेव्हा आम्ही मालिका खेळत होतो. माझ्याकडे या विषयावर बोलण्यासाठी कोणीही नव्हते. त्या वेळी, मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो की काय चूक झाली आणि मी काय चांगले करू शकलो असतो.”

रोहित शर्माने जेमिमा रॉड्रिग्सशी संवाद साधताना पुढे सांगितले की, ” पण मला वाटतं, हे त्या वेळी घडलं हे महत्त्वाचं आहे, आपण आजपासून दहा वर्षांनंतर बोलत आहोत, आणि त्यावेळी मी फक्त २३ किंवा २४ वर्षांचा होतो. त्यामुळे, मला माहित होते की माझ्यामध्ये बरेच क्रिकेट शिल्लक आहे आणि तो जगाचा अंत नाही आणि माझ्यासाठी पुनरागमन करणे अधिक महत्त्वाचे आहे. जे काही घडले ते घडले, तुम्ही त्यात काहीही बदल करू शकत नाही. मात्र, या काळात मी १ महिना डिप्रेशनमध्ये गेलो आणि कोणाशीही बोलत नव्हतो.” रोहितने याआधीही विश्वचषक खेळता न आल्याचे दुःख व्यक्त केले आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!