Share

अभिनेत्री शर्मिला शिंदेची वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी अभिनेत्री शर्मिलाने देशातील वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर भाष्य केला आहे. तिने  सोशल मीडियावर देशातील महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फोटो शेअर केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित इंधनाच्या दरवाढीवरून चिंता व्यक्त केली आहे. दरवाढ अशीच सुरू राहिली तर मुंबई लवकरच युरोपीयन शहरासारखी होईल, असंही मत तिने मांडलं.

यासोबतच तिने लिहिलं आहे की, ‘सायकल खरेदी करावी लागेल. काय वाटतं? रस्त्यावर सायकलींसह मुंबईसुद्धा लवकरच युरोपीयन शहरासारखी दिसू लागली तर मला आश्चर्य वाटणार नाही.’

शर्मिलाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मराठी आणि ‘मेरे साई’ या हिंदी मालिकेत काम केलं आहे. शर्मिलाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. हॅरी पॉटरचा झाडू घेऊन फिरायला लागेल, असंही एकाने मस्करीत लिहिलं. तर काहींनी शर्मिला सायकल विकत घेण्याचा सल्ला दिला. ‘मी बाईक विकून सायकल घेतली’, असंही एका युजरने लिहिलं. ‘आता फक्त हाच पर्याय उरला आहे’, असं एकाने म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

“पाकिस्तानची संसद बरखास्त करा” – इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
“…व्वा रे रक्तपिपासू व्यापारी मोदी सरकार”, नाना पटोलेंचा हल्लाबोल
PAK vs AUS: बाबरचे रेकॉर्ड मेकिंग शतक; कोहलीही करू शकला नाही ‘अशी’ कामगिरी!
“…त्या पक्षात जातीवाद असूच शकत नाही”, राजे ठाकरेंच्या टीकेवर रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर
बाहुबली’ फेम राणा दग्गुबातीच्या चाहत्यांना आनंदाची बातमी! लवकरचं होणार बाबा  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!